Posts

Showing posts from July, 2018

शेतीची शाळा २

Image
शेतीची शाळा १ शेतीच्या शाळेची सुरुवात पाच गुंठे जमीन वापरायला घेऊन करायची असं ठरलं. ही जमीन विज्ञान आश्रमाच्या आवारातलीच. त्यामुळे तिला कुंपण होतं, चोवीस तास कुणीतरी तिथे असणार होतं. रस्ता, वीज, पाणी (मनपाचं!) मिळवण्याची कुठलीच अडचण नव्हती. फक्त पाणी टंचाई झाली तर पाणी वापरावर काही बंधनं निश्चितच असणार होती. जमीन तशी पडीक होती, ती लागवडीयोग्य करण्यापासून सुरुवात करायची होती. त्यामुळे पहिलं काम होतं तिथला कचरा काढण्याचं. बांधकामाचा राडारोडा, दारूच्या बाटल्या असं वाट्टेल ते होतं तिथे. ते आधी साफ करून घेतलं. त्यानंतर मातीची तपासणी केल्यावर लक्षात आलं, की या जमिनीमध्ये सेंद्रीय कर्ब खूप कमी आहे, नत्राचीही कमतरता आहे. म्हणजे आता जमिनीचा कस सुधारायला हवा. जमिनीचा कस सुधारण्यासाठी म्हणून तिथे कम्पोस्टिंग करता येईल असं वाटलं. कम्पोस्टिंग तसं थोडंफार माहित होतं, पण ते घरच्यापुरतं, किंवा सोसायटीच्या ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यापुरतं. एवढ्या जमिनीचा कस वाढवायचा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर सगळं व्हायला हवं होतं. आणि आम्हाला शेती शिकायची होती, त्यामुळे शेतकर्‍याला परवडतील अशा मार्गानेच कस

शेतीची शाळा १

एक जुनंच खूळ पुन्हा नव्याने डोक्यात घेतलंय. आपलं एक शेत असावं असं दिवास्वप्न मी कित्येक वेळा पाहिलंय, आणि आपल्या गेल्या काही पिढ्यांचा शेतीशी काहीही संबंध नाही, यातलं आपल्याला ओ की ठो कळत नाही, शेती करणारे परवडत नाही म्हणून सोडताहेत आणि दुसरा पर्याय असताना शेती करणं म्हणजे भिकेचे डोहाळे इ. इ. सगळं ऐकून समजून शेती शक्य नाही म्हणून हा विचार झटकून टाकायचा प्रयत्नही केलाय. पण तीन महिन्यांपूर्वी माझी मैत्रीण, माऊच्या सखीची आई याच खुळाने अशीच झपाटलेली असतांना, एकेकटीने हे शक्य नाही, पण आपण मिळून काही करू शकतो, मज्जा येईल करायला!” असं दोघींच्या लक्षात आलं, आणि आम्ही आपल्याला रोज जाऊन कसता येईल अशी जमीन हवी म्हणून शोधायला लागलो. घरापासून एक – दीड तासाच्या अंतरातली जमीन घ्यायची, आणि आपण स्वतः कसायची अशी साधारण डोक्यात कल्पना घेऊन शेतं बघत हिंडायला सुरुवात झाली. अजून एक मैत्रीण पण आमच्यात सामील झाली. घरापासून एक – दीड तासात गाडीने पोहोचता यायला हवं, शेतापर्यंत रस्ता हवा – कुणाच्या बांधावरून जाणं आणि त्याचे वाद परवडणारे नाहीत, पाणी आणि वीज ऍक्सेसिबल पाहिजे हे सगळे निकष लावल्यावर मिळणारी जमीन प

The One Straw Revolution – Masanobu Fukuoka

शेतकरी आणि तत्त्वज्ञ मासानोबू फुकुओका हा सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ZBNF अशा सगळ्या शेतीपद्धतींच्या मुळाशी असणारा बाप माणूस आहे. जपानी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या फुकुओकांचा सूक्षमजीवशास्त्राचा आणि शेतीशास्त्राचा अभ्यास होता. झाडांवरच्या रोगांचा अभ्यास करणारा संशोधक म्हणून त्यांनी करियरची सुरुवात केली. पण पुढे पाश्चात्य / आधुनिक शेतीशास्त्राचा मार्ग चुकतो आहे याविषयी त्यांची खात्री झाली, आणि संशोधकाच्या नोकरीचा राजिनामा देऊन फुकुओका घरच्या शेतीकडे वळले. १९३८ पासून त्यांनी सेंद्रीय लिंबूवर्गीय फळबागांचे प्रयोग आणि निरीक्षणे करायला सुरुवात केली, आणि यातून हळुहळू त्यांचा नैसर्गिक शेतीचा विचार विकसित झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर १९४७ पासून त्यांची सेंद्रीय भातशेतीही सुरू झाली. त्यांनी “One Straw Revolution” १९७५ मध्ये लिहिलं. डोळस प्रयोग आणि इतका प्रदीर्घ अनुभव या पुस्तकाच्या मागे आहेत, त्यामुळे त्याचं हे पुस्तक म्हणजे जगभरातल्या नैसर्गिक शेतीवाल्यांचं बायबल समजलं जातं. खरं म्हणजे हे पुस्तक घेऊन कितीतरी वर्षं झाली. ते वाचायलाही सुरुवात केली, पण काहीतरी बोचत होतं वाचतांना, पुस्तक काही मी