Posts

Showing posts from August, 2018

नांगरणीशिवाय शेती – प्रताप चिपळूणकर

प्रताप चिपळूणकर हे गेली ४० वर्षे शेती करत आहेत. शेतीविषयातले ते पदवीधर आहेत, आणि त्यांचा सूक्ष्मजीवशास्त्राचाही अभ्यास आहे. प्रामुख्याने ऊस आणि भात ही पिके ते घेतात. त्यांचा अभ्यास आणि शेतीतले अनुभव या दोन्हीच्या आधारे नांगरणीशिवाय शेती पद्धतीविषयी त्यांनी या पुस्तकात माहिती दिलेली आहे. पुस्तकातील लेख आधी ऍग्रोवनमध्ये लेखमालिका स्वरूपात प्रसिद्ध झालेले आहेत, त्यामुळे काही ठिकाणी द्विरुक्ती दिसते, पण संवर्धित शेतीविषयी बरीच माहिती या पुस्तकामधून मिळते. हे पुस्तक आणि प्रताप चिपळूणकरांचं एक व्याख्यान या दोन्हीमधून मिळालेली / मला समजलेली माहिती इथे एकत्र दिली आहे. * (Resource conservation technology) संवर्धित शेतीचा भर प्रामुख्याने गरजेपुरती नांगरणी किंवा नांगरणीशिवाय शेती यावर असतो. माणसाच्या किंवा शेतीच्या इतिहासामध्ये नांगराचा शोध, पशूंकडून नांगरणी, लाकडाऐवजी लोखंडी नांगराचा वापर हे प्रगतीचे टप्पे मानले गेलेले आहेत. पूर्वमशागत जितकी चांगली, जितकी खोल नांगरट तितकं उत्तम पीक हा विचार इतक्या काळापासून रुजलेला आहे. नांगरणी कमी करणे हा विचार विसाव्या शतकात प्रथम पुढे आला. रासायनिक खतांचा व

Love - Hate - Love

Image
पावसाळ्यात टेकडीवर हा केना खूप वेळा पाहिलाय. त्याच्या गोड दिसणार्‍या निळ्या – जांभळ्या रंगाच्या फुलांचे कौतुकाने फोटोही काढलेत भरपूर. नंतर मग मैत्रिणीकडून समजले की ही एक रानभाजी आहे, ओडिशामधले आदिवासी याची भाजी खातात. केन्याविषयीचं माझं प्रेम अजून जरासं वाढलं मग. पण मग शेतीची शाळा सुरू झाली. पावसाळा सुरू झाला, आणि सगळं शेत केन्याने भरून गेलं! “इथलं तण वेळीच काढा, नाहीतर छातीभर उंचीचं रान माजतं दर वर्षी. सापही भरपूर आहेत. त्यामुळे तण उगवून आलं, की नांगर फिरवायचा. पुन्हा एकदा तण उगवून येईल, पुन्हा नांगर फिरवायचा. त्यानंतर परत फारसं तण उगवून येणार नाही” असा जाणत्यांचा सल्ला मिळाला. शेतात ट्रॅक्टर घालायचा नाही असा शक्यतो विचार होता. पॉवर टिलर मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. शहरातल्या शेतात बैलाचा नांगर फिरवायला बैल सुद्धा मिळाले, पण नांगर नव्हता. त्यामुळे पाऊस चांगला सुरू झालाय, शेत नांगरलेलं नाही, तण माजतंय, आणि काहीच पेरलेलं नाही अशी अवस्था झाली. आपण हाताने तण काढावं, का मजूर लावून काढून घ्यावं, आणि तण काढलं, तरी माती मोकळी कशी करणार असे सगळे प्रश्न. कम्पोस्टच्या

शेतीची शाळा ३

शेतीची शाळा २ द्विदल धान्यांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठींमध्ये र्‍हायझोबियम जिवाणू असतात. या जिवाणूंचं आणि झाडाचं symbiotic परस्परावलंबन आहे. झाडं या जिवाणूंना कर्ब पुरवतात, तर हे जिवाणू हवेतल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण करून झाडांच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असणारा नत्र जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात, आणि ही झाडं जमिनीतच कुजवल्यामुळे जमिनीतला सेंद्रीय कर्बही वाढतो. त्यामुळे जमिनीचा कस सुधारतो. अशा प्रकारे जमिनीचा कस सुधारण्यासाठी मुद्दाम झाडं लावण्याला हिरवळीचं खत म्हणतात. कम्पोस्ट करून झाल्यावर चांगला पाऊस झाला आणि जमिनीमध्ये ओलावा आला, म्हणजे हिरवळीचं खत म्हणून ताग पेरा असा सल्ला आम्हाला जाणकारांनी दिला होता. इतके दिवस नुसतं ओल्या – कोरड्या कचर्‍यावर पाणी मारल्यावर खरोखरच काही पेरायचं ही कल्पनाच सुखावणारी होती. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर जरा घाईनेच तागाची पेरणी केली.  तागाचं बियाणं पेरलं, आणि पावसाने दडी मारली. पावसाची वाट बघणं हा आपल्याकडे शेतकरी होण्यातला अविभाज्य भाग आहे, तर ते काम आमचं सुरू झालं. कम्पोस्ट सॅंडविचवरची जमीन चांगली तयार झालेली होती आणि ओलावा धरून